- Published on
गणपती आरती मराठी मध्ये
Table of Contents
- श्री गणेश आरती
- श्री शंकर आरती
- दुर्गा आरती
- श्री विठ्ठल आरती
- श्री पांडुरंग आरती
- श्री दत्त आरती
- घालिन लोटांगण
- श्लोक
Download Ganpati Aarti in Marathi pdf
श्री गणेश आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया॥२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥३॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें॥१॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती॥ जय देव० ॥२॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी।
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम।
जय देव जय देव० ॥३॥
श्री शंकर आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।
कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।।
देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।4।।
दुर्गा आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी ॥धृ॥
तुजवीण भुवनी पाहता तुज असे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥२॥
प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥३॥
श्री विठ्ठल आरती
येई हो विठ्ठले माझे माउली ये ||
निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ||
आलिया गोलिया हाती धाडी निरोप |
पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||
असो नासो भाव आम्हा तुज्या थाया
कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
श्री पांडुरंग आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।।
जय देव ।।3।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव जय देव ।।5।।
श्री दत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।। १।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता।
जय देव जय देव।
सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।। २।।
जय देव जय देव
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला ।
जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।। ३।।
जय देव जय देव
दत्त दत्त असे लागले ध्यान।
हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।। ४।।
जय देव जय देव
घालिन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
श्लोक
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा ||
उपेक्षु नको गुणवंता अनंता |
रघुनायका मागणे हेचि आतां ||१||
उपासनेला दृढ चालवावें |
भूदेव संताशी सदा नमावें ||
सत्कर्म योगे वय घालवावें |
सर्वामुखी मंगल बोलवावें ||२||
कैलासराणा शिव चंद्रमौळी |
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ||
कारुण्य सिंधू भवदुःखहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी ||३||
उडाला उडाला कपि तो उडाला |
समुद्र उलटोनी लंकेशी गेला ||
लंकेशी जाऊनी चमत्कार केला |
नमस्कार माझा त्या मारूतीला ||४||
मोरया मोरया मी बाळ तान्हें |
तुझीच सेवा करु काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||५||
ज्या ज्या ठिकांणी मन जाय माझे |
त्या त्या ठिकांणी निजरूप तुझे ||
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकांणी |
तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ||६||
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ||
तया आठविता महापुण्यराशी |
नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी ||७||