Published on

मारुती स्तोत्र - Maruti Stotra

मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पाताळदेवताहंता भव्य सिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥

ध्वजांगे उचली बाहू आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडे माईले नेणों आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिं कासोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणूपासोनि ब्रह्मांडा येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटें ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छे करू शके ।
तयासी तुळणा कैंचीं ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें ॥१६॥

रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।